शिरपूर - तऱ्हाडी: - प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था यांच्यातर्फे दरवर्षी इंस्पायर अवार्ड मानक योजनांतर्गत इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन भरवले जाते यासाठी तऱ्हाडी येथील कै अण्णासो साहेबराव सोमा पाटील विद्यालयातील विद्यार्थी वैभव संतोष भामरे इयत्ता सातवी यांनी या प्रदर्शनात रोप लावणी यंत्र हे उपकरण तयार केले होते या या उपकरणामुळे कांदा मिरची या साठी रोपे लावण्याकरिता शेतकरी वर्गाला मजुरांची मदत घेतात त्यामुळे वेळ व मजूर जास्त प्रमाणात लागतात याकरिता वेळ व मजूर कमी लागावी यासाठी या यंत्राच्या साह्याने रोपे लावणे सोपे जाते याची जिल्हा स्तरावर वरून निवड झालेली आहे स्टेट लेव्हल एक्झिबिशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन
२०२०/२१ करिता वैभव संतोष भामरे याची राज्यस्तरावर निवड झालेली आहे या उपकरणासाठी विज्ञान शिक्षक व्ही डी पाटील व भावेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले यांची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे. कार्याध्यक्ष सुभाष भामरे. व मुख्याध्यापक एन. एच कश्यप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे कौतुक केले आहे.
Tags
news
