गांजा तस्करी करणारे दोघे शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात





शिरपूर -  महामार्गावरील आमोदे शिवारात असलेल्या उड्डाण पूलाखाली दोघे जण गांजा विक्री करीत असल्याची खबर मिळाल्याने शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गांजा बाळगणारे दोघे पोलिसांच्या हाती लागले असून त्यांनी ज्यांच्याकडून हा गांजा घेतला त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरपूर फाट्यावरील आमोदे शिवारात उड्डाण पूलाखाली दोघे जण गांजा विकत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी काल रात्री ८. ३० च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. यावेळी सुमारे २५ किलो गांजासह दोघे जण पोलिसांच्या हाती लागले. किसन विजय मारीमुत्तु ( २२ ) व गौरव ऊर्फ गोलु दिनेश कजानिया (१९) दोघे रा. उल्हासनगर, जि. ठाणे असे त्यांचे नाव असूनत्यांनी हा गांजा शिरपूर तालुक्यातील आपसिंग पाडा येथील मिथुन पावराकडून घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांजवळील २४ किलो ६९० ग्रॅम वजनाचा अंदाजे १ लाख २२ हाजर ४५० रुपये किंमीचा गांजा जप्त केला असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरिखक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने