शिरपूरात 3 बोगस डॉक्टरांवर कारवाई विनापरवाना औषधोपचार करणाऱ्यांवर संक्रांत




शिरपूर तालुक्यातील बोराडीसह उमर्दा परिसरातील तीन बोगस डॉक्टरांवर काल कारवाई करण्यात आली. परवाना नसतांना रुग्णांवर औषधोपचार करतांना दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर तिसरा फरार झाला आहे. तिघांवर वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याबाबत शिरपूर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सुरेश बागुल (वय ३ ९) यांनी तालुका पोलिसात फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार विजय धुडकु बडगुजर ( वय ४९ रा. घर नं. १५ बन्सीलाल नगर, वरझडी नगर, शिरपूर ) हा बोराडी गावात एका पत्र्याच्या घरात अॅलोपॅथिक औषधोपचार करण्याचा परवाना नसतांना तसेच मेडीकल्स कॉन्सील ऑफ इंडीयाकडील रजिस्ट्रेशन परवाना नसतांना रुग्णांवर औषधोपचार करून अॅलोपॅथिक साठा कब्जात बाळगुन त्याचा उपयोगकरतांना मिळून आला. तसेच बोराडी गावातील ग्रामपंचायत चौकाच्या पुढे बुडकी रस्त्याच्या जवळ असलेल्या एका घरात भगवान कांतीलाल बडगुजर हा वरीलप्रमाणे परवाना नसतांना रुग्णांवर उपचार करत होता. मात्र कारवाईची चाहुल लागल्याने तो फरार झाला. तसेच उर्मदा गावात मंगल शुभम हिरा, सुबल हिरा ( रा. मधुरिया नार्थ, २४ परगाणास वेस्ट बंगाल ह. मु उर्मदा ता. शिरपूर ) हा देखील गावात राहत्या घरात परवाना नसतांना रुग्णांवर औषधोपचार करतांना मिळून आला. त्यावरून वरील तिघांवर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ मधील कलम ३३, ३३ अ, ३४, ३६ सह फुड व ड्रग कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पीएसआय बी. आर. पाटील व नरेंद्र खैरनार करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने