. शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ओंकारआबा जाधव (मा. जि.प. सदस्य), हे दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता शिरपूर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसिल कार्यालयासमोर लाक्षणीक (लक्षवेधी) उपोषण करणार आहेत. यासाठी त्यांनी तहसीलदार शिरपूर व प्रशासनाच्या इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून या निवेदनात शिरपूर इत्यादी मागण्यांचा समावेश असून दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी मा. तहसिलदार कार्यालयासमोर, शिरपूर, जि. धुळे येथे सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० या वेळेत वरील विषयानुसार लाक्षणीक (लक्षवेधी) उपोषण करण्यात येणार आहे .
सन २०११ पासून दहिवद शिवाजी सरकारी साखर कारखाना तसेच सुतगिरणी व दुध संघ बंद अवस्थेत आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कर्मचारी, व्यापारी व तालुक्यातील तमाम जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरी वरील कृषी पुरक उद्योग सुरु झाल्यास तालुक्यातील आर्थिक व्यवस्था सुधारेल व शेतकरी सुखी होईल.
तसेच महावितरणाकडून देण्यात येणाऱ्या बिलाचे विवरण व स्पष्टीकरण जनतेसमोर करण्यात यावे. त्याचबरोबर तापी पुलावरुन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यकरीता तापी नदिवरील सावळदे व गिधाडे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळी तात्काळ बसवण्यात यावी.
त्याचप्रमाणे शिरपूर नगरपालिकेत पाणी बिलाची आकारणी प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने जनतेला अधिक भार होतो, म्हणुन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे पाण्यावरील बिल कमीत कमी आकरण्यात यावे.
वरील विषयाबाबत शासन प्रशासनाने चौकशी करून तात्काळ दखल न घेतल्यास आम्ही सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनता रास्तारोको, जेलभरो, शिंगाडे मोर्चा अशा प्रकारचे जन आंदोलने करण्यात येतील. त्यात होणारे परिणामास सर्वस्वी शासन-प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदन देण्यात आले असून तालुक्यातील शेतकरी कष्टकरी कामगार व जनतेला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
Tags
news
