सावित्रीच्या प्रेरणेतून अन् जिजाऊच्या संस्कारातून आपली मुले घडवूया.. सरला बागुल




शिरपूर: आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा,वरवाडे येथे ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने.. 'प्रबोधनाबरोबर क्रीडा महोत्सवाचे' आयोजन शालेयस्तरावर  करण्यात आले आहे.कार्यक्रम प्रसंगी व्याख्याते सरला बागुल  सावित्रीसखी अध्यक्षा, शिरपूर व ज्योती इंदवे  लक्षसखी अध्यक्षा शिरपूर हे होते.प्रमुख उपस्थिती सिमा रंधे सदस्य जि.प.धुळे , सौ.चंद्रकला संतोष माळी नगरसेविका शि.व.न.प.शिरपूर,निता सोनवणे विस्तार अधिकारी पं.स.शिरपूर,जिजाबाई मुरलीधर माळी सदस्य-उस्ताद मुरलीधर नथ्थु माळी सार्व.वाचनालय व ग्रंथालय वरवाडे शिरपूर,कल्पना राजपूत,ज्योती राणे- सोनवणे,कल्पना बोरसे व भारती पटेल होते. फुले दाम्पत्यचा सामाजिक व शैक्षणिक संघर्ष काळ आणि जोतीरावांनी सावित्रीला दिलेले उपदेशाची धड्यांची उजळणी यावेळी ज्योती इंदवे यांनी मांडली.आपल्या मुलांना घडवताना शैक्षणिक जागृती बरोबरच सावित्रीच्या प्रेरणूतून आणि जिजाऊंच्या संस्कारातेन मुले आपण घडवूया.फुले दाम्पत्य ही १८ व्या शतकातील कर्मठ सनातनी काळात मनुस्मृतीच्या नियमांना लाथाडून सत्यशोधक चळवळीचे कार्य हाती घेतले.आज त्यांच्या विचारांची जागृती आवश्यक आहे असे सरला बागुल यांनी माडले.विसाव्या शतकाचा संघर्ष कठीण होता.आज आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि चांगले संस्कार गरजेचे आहेत म्हणून शिक्षक म्हणून आमची व पालक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे असे मनोगतात नियोजित कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडले.याच वेळी क्रीडा महोत्सवाची सुरुवात रस्सीखेचद्वारे करण्यात आली. पालक व प्रमख पाहुण्यात रस्सीखेच मध्ये पालकांनी बाजू मारली.पालकांनी संगीत खुर्ची स्पर्धेत सहभाग घेतला  जमनाबाई मन्साराम पवार,रशोदाबाई शिरसाठ, कमलाबाई शंकर माळी यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकावले.विद्यार्थ्यांकरीता दोरीउडी,गोणपाट उडी,धावणे,तीन पाय शर्यत, लिंबू चमचा,क्रिकेट,चेस,बेडूक उडी इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरीता हंसराज पाटील,मनिषा पाटील,सुनील खैरनार,योगिता भामरे,जयश्री पाटील, तूळशीराम पावरा,राकेश शिरसाठ,विद्या बारी,दिपक गिरासे,दिनेश पावरा व चंदन माथने यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने