हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



शिरपूर/प्रतिनिधी-
हिंदूराष्ट्र सेनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक़्रम साजरे करण्यात येत असून त्याच्याच एक भाग म्हणून दि.03/01/2022 रोजी वरवाडे येथे सावित्रीबाई फुले जयंती हिंदुराष्ट्र महिला आघाडी यांच्या पुढाकराने साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे प्रतिमापूजन सौ.धनश्री गितेश मोरे श्री.गितेश मोरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच महात्ेमा ज्योतीराव फुले यांचे प्रतिमेस मीना माळी ,पुर्वा मराठे ,वंदनताई मराठे,छायाताई पाटील,ताराबाई परदेशी,रेखा मराठे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी अ‍ॅडव्होकेट श्याम पाटील युवा सेना अधिकारी गोलू मराठे आनंद (वावड्या) पाटील,सागर पाटील,जयेश मोरे,तुषार बारी,भैय्या माळी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी,किरण कोळी,कृष्ण मराठे,रोहित भोई,सुनिल माळी,श्रीनाथ शिंदे,मनोज माळी,राजू माळी,योगेश माळी,तसेच वरवाडे परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने