नगर परिषद उदगीर शहर हद्दीतील सर्व बंद केलेले बोर तात्काळ चालू करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी




लातूर जिल्हा प्रतिनिधी राहुल शिवणे
नगर परिषद उदगीर शहरातील सर्व वार्डातील बोर नगर परिषदे च्या हलगर्जीपणा मुळे वीजबिल न भरल्यामुळे बोर बंद केले गेले आहे .महावितरण ने नगर परिषदेस वारंवार नोटीस देऊनही नगर परिषदेने वीजबिल न भरल्याने महावितरणने सर्व वार्डातील बोरचे कलेक्शन अचानक पणे कट केल्याने व न.प च्या हलगर्जीपणा मुळे उदगीर शहरातील मायबाप जनतेला न्याहक त्रास पाण्यासाठी करावे लागत आहे व न.प.च्या गैरसोयी मुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे .व कोरोना रोगाचा उद्रेक सुरू आहे.या परिस्थितीत आधीच हवालदिल झालेले गोरगरिबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाई ची समस्या ही विशेषतः महिलांकरिता अडचणींचा विषय आहे .अशा प्रसंगी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . म्हणून मा.महोदय साहेबांनी या विषयावडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सर्व वार्डातील बोर चालू करून उदगीर शहरातील सर्व नागरिकांची गैरसोय तात्काळ दुर करावी ही नम्र विनंती . 
जर सर्व वार्डातील बोर 48 तासात चालू न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर घागर मोर्चा आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती .असे निवेदन 
आज उपजिल्हाधिकारी साहेब  यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे , उदगीर -जळकोट विधानसभा अध्यक्ष - सूर्यभान चिखले मामा , तालुका अध्यक्ष -रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका उपाध्यक्ष - संदीप पवार , तालुका  कार्याध्यक्ष महादेव आपटे ,तालुका संघटक - सोपान राजे , प्रसिद्धी प्रमुख - अभय कुलकर्णी ,तालुका सरचिटणीस - सुदर्शन सूर्यवंशी , सुभाष किटेकर,पदाधिकारी च्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले ..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने