ऋषिकेश शिंपी शिरपूर )
धुळे ते चाळीसगाव मेमू काही दिवसांपूर्वी सुरु झाली. त्यामुळे अनेकांची सोय झाली असून सद्य: स्थितीत मेमूच्या दोनच फेऱ्या होत असून त्या वाढवण्यात याव्या , धुळे ते नाशिक नवीन मेमू रेल्वे सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वे मंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार , रेल्वेच्या मुंबई व भुसावळ येथील प्रमुख अधिकाऱ्यांना ई - मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. तसेच धुळे रेल्वे स्टेशनचे प्रबंधक संतोष जाधव यांनाही निवेदन देण्यात आले.
Tags
news
