नवस फेडण्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जात असलेल्या मोटारसायकलला राज्य सीमेवरील बिजासन घाटात कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील मेहुणे व शालक जागीच मयत झाले. याप्रकरणी बिजासन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई - आग्रा महामार्गावर राज्य सीमेवरील बिजासन घाटात जामनिया गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बाला भुवनसिंग डुडवे २२ रा. साजमली नवलपुरा सेंधवा व रुस्तम अकरम भिलाला १४ रा.अछली, मध्यप्रदेश हे शालक व मेहुणे
मोटारसायकल एमपी ४६ एमजे २०६८ ने नवस फेडण्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी जात असतांना भरधाव वेगात येणारी कंटेनर एमपी ०४ जीबी- २१८९ ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवरील शालक व मेहुणे गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाले. घटनेची माहिती मिळताच बिजासन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघा मृतांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला असुन कंटेनर बिजासन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags
news
