कृषी विभागामार्फत आत्मा योजनेअंतर्गत हरभरा पिकावर शेतकरी शेती शाळा



      शिरपूर - तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आत्मा योजनेअंतर्गत नुकतीच मौजे जळोद तालुका शिरपूर येथे हरभरा पिकावर शेतकऱ्यांची शेती शाळा हा कार्यक्रम राबविण्यात आला त्यात हरभरा पिकावर येणाऱ्या कीड-रोग याविषयी ओळख व त्यावर उपाय कसे करावे याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन श्री सुधीर विषयी मंडळ कृषी अधिकारी अर्थ यांनी मार्गदर्शन केल. बुरशीचा प्रादुर्भाव व व्यवस्थापन याविषयी श्रीमती प्रज्ञा मोरे मॅडम आत्मा बी टी एम व उत्पादन वाढीसाठी कोणत्या बाबींचा वापर करावा व रासायनिक औषध व खतांचा वापर कमी करून सेंद्रीय व जैविक घटकांचा वापर करण्यासंबंधी श्री विशाल पावरा कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री महेंद्र पाटील श्री अतुल बाविस्कर श्री ललित पाटील कृषी सहाय्यक यांनी केले सदरील कार्यक्रमास मौजे जळोद व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने