नाशिक ला अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कार्यालय कार्यान्वित नाशिक शांताराम दुनबळे.




नाशिक= नाशिक व अहमदनगर जिल्हयाकरिता आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नाशिक येथे कित्येक वर्षे पासून एकच कार्यालय कार्यान्वित होते.

 आदीवासी विकास समितीतील प्रकरणांचा वाढता ओघ पाहता व लाभार्थ्यांच्या सोयीकरिता शासनाने 13 सप्टेंबर, 2019 च्या निर्णयान्वये नाशिक-2 हे नवीन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 10 जानेवारी, 2022 पासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक-2 हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या नवीन समितीच्या कार्यक्षेत्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर हे तालुके व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. नवीन नाशिक-2 समितीचे कामकाज आदिवासी विकास भवन, गडकरी चौक, नाशिक येथून सुरू करण्यात आले आहे. तरी संबंधित तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना तसेच या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सेवाविषयक बाबी बाबत पत्रव्यवहार करताना  सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती 
 नाशिक असा उल्लेख करावा असे आवाहन प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने