आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्याचे निषेध निवेदन
शिरपूर प्रतिनिधी- औरंगाबादचे एमआयएम खासदार इस्तियाज जलील यांच्या जाहीर निषेधार्थ आजचे अकोट तालुक्यातील सर्व पक्षीय संघटनांनी मिळून आमदार काशीराम पावरा यांच्या सोबत सर्व पक्ष संघटनांच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी शिरपूर व तहसीलदार यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त केला आहे .
औरंगाबाद शहरात हिंदुस्थानचे आराध्य दैवत राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचे भव्य स्मारक महानगरपालिकेतर्फे उभे केले जात आहे. सदर स्मारकास संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी तथा जनतेने पाठिंबा दिलेला आहे. मात्र एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार श्री इस्तियाज जलील यानी सदर स्मारकास फक्त विरोधासाठी विरोध करून गलिच्छ राजकारणाला वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे समस्त राष्ट्रभक्त जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. श्री जलील यांनी स्मारकाऐवजी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या नावाने सैनिकी शाळा काढावी अशी सूचना केलेली आहे. आम्ही उदार अंतःकरणाने खासदार साहेब यांनी केलेल्या सूचनेचे स्वागत करती. पण त्याच वेळेस खासदार जलील यांनी स्वतःपुढाकार घेऊन सैनिकी शाळा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा व होऊ घातलेल्या स्मारकास विरोध करू नये असे आवाहन या निवेदनामार्फत करतो.
सनातन भारतभूमी ही वीर पुरुषाची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. ज्यांनी त्या देशाच्या जान-बान शान साठी सर्वस्वाची आहती दिली अशा थोराचे बलिदान समय भारत राष्ट्र कसे विसरू शकेल? येणाऱ्या पिढयांना महापुरुषांचे स्मरण व्हावे आणि त्यांच्यासमोर सतत आदर्श असावा म्हणून स्मारके उभारली जात असतात खासदार जलील यांनी हे लक्षात घ्यावे कि वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या लढ्यात और हकीम खान सूरी यांनी आपल्या लढवस्या तीनशे पठाणासह विश्वप्रसिद्ध हळदी घाटीच्या युद्धात आहुती दिलेली होती.
खासदार जलील यांनी आपल्या पत्रातून काहीतरी सूचना देऊन एका भव्य स्मारकास विरोध करुन त्यांच्या मनातील विचारांचे दर्शन दिलेले आहे हे समजायला जनता दूधयुकी नाही याचे पत्राद्वारे आम्ही खासदार जलील यांच्या वक्तव्याचा निषेध करतो.त्यांनी समाजमनाच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमा मागावी असे आवाहन करतो अशी मागणी केली आहे.
यावेळी शिरपूर तालुका डॉक्टर असोसिएशन यांच्याकडून देखील निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले या काळात उत्कृष्ट काम केले म्हणून माननीय तहसीलदार शिरपूर व आरोग्य अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्यामार्फत डॉक्टर पितांबर दिघोरे व डॉक्टर योगेश जाधव यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळेस शिरपूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारीशिरपूर तालुका सर्व धर्म समाज समावेशक हिंदू संघटना यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, रावसाहेब प्रभाकर चव्हाण ,शिवसेनेचे बाळासाहेब राजपूत भरत सिंह राजपूत सामाजिक कार्यकर्ते भुपेश परदेशी ,राज सिसोदिया ,नगरसेवक हेमंत पाटील ,नगरसेवक देवेंद्र राजपूत, नितीन बाबा राजपूत , रोहित शेटे, श्यामकांत इसी राजेंद्र पाटील राजेश मारवाडी मोहन पाटील जगत सिंग राजपूत रत्नदीप सिसोदिया दिनेश पाटील उदय पाटील प्रेम सिंग राजपूत संजय चौधरी यासह अनेक राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता यांच्या सह्या आहेत
Tags
news

