शकुंतला गारटकर यांच्या निधनाने ज्येष्ठ आदर्शवत व्यक्तिमत्व हरपले- हर्षवर्धन पाटील प्रतिनिधी दत्ता पारेकर



  
पुणे:इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक शकुंतला बजाजी गारटकर वय 94 यांच्या निधनामुळे गारटकर कुटुंबावर शोककळा पसरली असून शकुंतला गारटकर यांच्या निधनाने आदर्शवत व्यक्तिमत्व हरपले आहे. या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती देवो असे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज सांत्वन भेटीच्या वेळी मत व्यक्त केले.
   श्री.नारायणदास रामदास प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर यांच्या मातोश्री शकुंतला बजाजी गारटकर यांचे काल वृद्धापकाळाने  निधन झाले. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज या कुटुंबाला भेट देत त्यांचे सांत्वन केले.
    या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश कोथमिरे, डॉ. संजय हेगडे, माजी मुख्याध्यापक अरविंद गारटकर, जयवंत गारटकर, प्रसाद गारटकर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने