पुणे:आज बावडा येथील सटवाई माता मंदिर येथील सभामंडप, बाजार तळ येथील काँक्रिटीकरण, खंडोबा नगर येथील नवीन स्मशानभूमी शेड, लिंगायत समाजासाठी असलेल्या दफनभूमी संरक्षक भिंत बांधकाम, आगलावे वस्ती येथील रस्ता तसेच आगलावे वस्ती येथील नवीन स्मशानभूमी शेड बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या भूमिपूजन प्रसंगी अशोकभाऊ घोगरे, बावडा गावचे सरपंच किरण काका पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद पुणे येथून सटवाई मंदिर सभामंडप साठी 6 लक्ष रुपये, बावडा बाजार तळ कॉंक्रिटीकरण साठी 15 लक्ष रुपये, खंडोबानगर नवीन स्मशानभूमी शेड साठी 6 लक्ष रुपये, लिंगायत समाज दफनभूमी संरक्षण भिंत बांधकामासाठी 8 लक्ष रुपये, आगलावे वस्ती येथील रस्त्यासाठी 20 लक्ष रुपये तसेच आगलावे वस्ती येथील नवीन स्मशानभूमी शेड साठी 6 लक्ष रुपये असा एकूण 61 लक्ष रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी मंजूर केला आहे.
Tags
news
