नाशिक=भारतीय बहुजन सेना नाशिक जिल्हा स्तरीय बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बोधले नगर येथे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रशांत जी घोडेराव साहेब यांचे अध्यक्षतेखाली तर राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश गायकवाड उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय राज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.होऊ घातलेल्या राज्य भरातील स्थानिक स्वराज्य संस्था, व नगरपालिका, महानगर पालिका निवडणुक भारतीय बहुजन सेना सर्व तयारीनिशी स्वबळावर लढणार असल्याचे डॉ प्रशांत जी घोडेराव व राज्य अध्यक्ष विजय राज पगारे यांनी सांगितले.बैठकीस जिल्हा भरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून रामनाथ पगारे तर नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शिवाजी गायकवाड यांची नियुक्ती संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रशांत जी घोडेराव यांनी नियुक्ती पञकाद्वारे केली.उपस्थित असंख्य कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले
Tags
news
