*शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व गोरगरिबांना हिवाळी रग वाटप करण्यात आले* दोडाईचा अख्तर शाह



शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे हे आपला वाढदिवस केक कापून, पुष्पहार किंवा पुष्पगुच्छ न स्वीकारता अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरा करीत असतात गोरगरीब कुटुंब यांना संसार उपयोगी वस्तू देऊन तर कधी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबांच्या परिवाराला साळी चोळी देऊन तर कधी भारत मातेचे रक्षण करणारे रिटायर सौनिकानां मशालीचे प्रतिक म्हणून समई व शाल श्रीफळ देऊन सत्कार करणे अशा प्रकारे शानाभाऊ सोनवणे हे आपला वाढदिवस साजरा करीत असतात त्याच प्रकारे ह्या वर्षी म्हणजे आज दिनांक २६ जानेवारी २०२२ बुधवार रोजी गणराज्य दिनानिमित्त तसेच भगवा सप्ताह व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त व कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे त्यासाठी रुग्णांना लागणारे रक्त पुरवठा हा कमी पडू नये यासाठी त्यांनी त्यांच्या वर प्रेम करणारे शिंदखेडा तालुक्यातील सर्व मित्र परिवार व कार्यकर्त्याशी बैठक घेऊन रक्त दान शिबिर आयोजित करण्याचे सुचविले त्यामुळे आज शेवाळे गावातील सुमित देशमुख, प्रकाश(बबलु) कोळी, वैशाली ताई चव्हाण, प्रविण वाकडे, रावसाहेब कुवर, विष्णू कोळी,किरण सावळे सह परिसरातील नागरिकांनी शेवाळे गावात रक्त दान शिबिर आयोजित केली व स्वतः शानाभाऊ सोनवणे यांनी रक्त दान करून संपुर्ण दिवस न पुष्पहार, पुष्पगुच्छ किंवा केक न कापुन रक्तदाब शिबिर येथे थांबुन आपला वाढदिवस साजरा करणार असे कार्यकर्ते व मित्रपरिवार याना कळविले दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ पाटील, वासुदेव चित्ते,मनोजभाऊ परदेसी व संजय मगरे यांनी ह्या वर्षी थंडीचा प्रभाव जास्त जाणवत असल्याने दोंडाईचा येथे रेल्वे स्टेशन व बस स्थानकावर बसलेल्या भिकारी व गोरगरीब मजुर हे लहान मुल बाळांसोबत काम करुन आपला उदरनिर्वाह करत असतात त्या गोरगरिबांना हिवाळी रग शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते वाटप करुन वाढदिवस साजरा केला त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, रेल्वे स्थानक पि आय साहेब, विजय पाटील, वासुदेव चित्ते, हितेंद्र महाले, राकेश पाटील,मनोज परदेसी, राहुल मानीक, संजय मगरे, विजयाताई मराठे, निलेश मगरे,किरण सावळे, विष्णू कोळी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहुन वाढदिवस साजरा केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने