लग्न संकेतस्थळावरून मुलींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका सरकारी नोकराला अटक प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: बारामती तालुका पोलिसांनी  अजयकुमार नंदकुमार चटौला (रा. रुई रुग्णालय शासकीय वसाहत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून आतापर्यंत त्याने अनेक तरुणींना  फसवले असल्याचे तपासात समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार , मला आई-वडील नसल्याने मी एकटाच आहे. मी सरकारी नोकरीला असून अविवाहित असल्याची थाप तो मारत असे आणि सरकारी नोकरदार म्हणून तरुणी देखील सहजपणे त्याच्या गळाला लागत असत. अनेक विवाहाशी संबंधित संकेतस्थळावर त्याने नोंदणी केलेली असून अनेक जणींना त्याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे देखील उघड झाले आहे. तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आणि सापळा रचत त्याला सहा तारखेला भोर इथे अटक केली.

 
अजयकुमार नंदकुमार चटौला याच्या विरोधात मुंबई येथील एका ३९ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती आणि त्याने आपल्यावर लग्नाचे वचन देत बलात्कार केला असल्याचे देखील म्हटले होते . मुंबईत १ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा आरोपी चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात ‘स्विपर’ म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले.

अजयकुमार हा चक्क विवाहित असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली असून शादी डॉट कॉमवर मुलींना आरोपी ‘रिक्वेस्ट’ पाठवत असे आणि आपण सरकारी नोकरदार अजून मला आईवडील नाहीत आणि सरकारी नोकरी यामुळे मुली देखील त्याच्यासोबत बोलायला सुरु करायच्या. काही कालावधी गेल्यावर हा चक्क मुलींच्या घरच्यांना देखील भेटत असे आणि त्याचा विश्वास संपादन करायला आणि मुलीला फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करत त्यांच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवायचा मात्र त्यानंतर आर्थिक गरज असल्याचे सांगत पैसे देखील लुबाडत होता.


आरोपी चटौला हा पुण्यातील एका मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाणे करून तिला पळवून आणून भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना तक्रार दाखल होताच मिळाली आणि त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, दत्तात्रय मदने, चालक तुषार लोंढे हे भोर येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आणि त्याला भोर इथे बेड्या ठोकण्यात आल्या . न्यायालयाने आरोपीला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने