शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी येथील बबीता मंगेश पावरा (वय 20) हिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी हलविण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई नरेंद्र खैरनार करीत आहेत.
Tags
news
