आशा स्वयंसेविकाना ग्रा. प.कडून प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने येवला प. समितीसमोर 3 जाने. रोजी बेमुदत आंदोलन. नाशिक शांताराम दुनबळे




    येवला नाशिक=कोरोना महामारी च्या काळात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायत कडुन प्रोत्साहन भत्ता  जिल्हा परिषद आरोग्य  विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा कोरोना काळातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा खारीचा वाटा असून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने या कालावधीमध्ये अशा स्वयं सेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये ग्रामपंचायत स्तरावरून देण्याचे जाहीर केले होते परंतु एप्रिल 2020 नंतर येवला तालुक्‍यात कुठेही आशा सेविकांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला  प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही यासंदर्भात आशा स्वयंसेविका  व गटप्रवर्तक यांच्या कृती समितीने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना विचारणा केली असता त्यांनी 17 /6/ 2021 रोजी गटविकास अधिकारी यांना आदेश देण्याचे पत्र काढले होते त्याअनुषंगाने मे 2020 पासून आज पर्यंत  अद्यापही कोणत्याही ग्रा. प कडून आशा स्वयंसेविका  व गटप्रवर्तक यांना थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नसल्याने  3 .जानेवारी रोजी येवला पंचायत समिती समोर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले असून निवेदनावर नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे,
 सुनंदा परदेशी, स्वाती चव्हाण,वर्षा भावसार, सविता  अक्कर, शोभा गोराणे, संगीता वाघचौरे, निशिगंध पगारे, मनीषा भड, रंजना कदम, यांच्यासह  अशा  सेविकांच्या निवेदनावर सह्या आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने