नव्या वर्षात AISF ची धुळे जिल्ह्यात जोमाने सुरुवात, समन्वय समितीची निवड, ३० जानेवारी २०२२ रोजी जिल्हा अधिवेशन घेण्याचा निर्धार...




दि.३ जानेवारी २०२२ रोजी शिरपूर शहरात श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात ऑल इंडिया स्टुडंटस्  फेडरेशन (AISF) ची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून आपल्या शैक्षणिक समस्यांवर चर्चा केली, तसेच संघटीत होऊन विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली. नववर्षात संघटनेच्या कामात नवा जोश भरत सर्वानुमते जिल्हास्तरीय १७ सदस्यीय समन्वय समितीची निवड करण्यात आली, त्यात समन्वयक म्हणून राहुल पावरा, सह-समन्वयक म्हणून यश सूर्यवंशी, ऍड. गणेश पाटील, विशाल पावरा, अनिल पावरा, विशाल जेरमा पावरा आदींची निवड करण्यात आली. सभासद मोहिमेला आरंभ करत रविवार दि.३० जानेवारी २०२२ रोजी शिरपूर येथे AISF जिल्हा अधिवेशन घेण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला. AISF चे राज्याध्यक्ष कॉम्रेड विराज देवांग यांच्या प्रमुख उपस्थितीत, किसान सभेचे सल्लागार ऍड.मदननाना परदेशी, ऍड. हिरालाल परदेशी, ऍड. संतोष पाटील, कॉम्रेड अर्जुनदादा कोळी, ऍड. सचिन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने