जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले; Video व्हायरल करण्याची धमकी देत केले वारंवार अत्याचार प्रतिनिधी दत्ता पारेकर



पुणे : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने शहरात महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच या सर्व प्रकाराचा व्हिडीओही त्याने काढला. शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. तसेच नेकलेस, मंगळसूत्र घेऊन महिलेला मारहाण केली.

हा प्रकार जुलै ते २२ डिसेंबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र भांगले (रा. पाषाण, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहितीनुसार, भांगले याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच महिलेचे दागिने तिच्या संमतीशिवाय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने