महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थचा मोठा साठा जप्त शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई




शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री प्रवीण कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठा साठा जप्त केला आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मिळालेल्या गोपने माहितीच्या आधारे दिनांक 22 डिसेंबर रोजी सापळा रचून सदरची कारवाई केली आहे.


 सपोनि/शिरसाठ यांनी पथक तयार करुन दहिवद गावाचे शिवारात हॉटेल आई साहेब | समोर जावुन सापळा रचुन थांबले असता तेव्हा रात्री २२.०० वाजेच्या सुमारास बातमीप्रमाणे सेंधवा | कडुन येणाऱ्या रोड वरुन मालट्रक क्रमांक RJ 11 GB 8594 हि शिरपुर गावाचे दिशेने येत असल्याचे | दिसल्याने त्यावरील चालकास टॉर्चचा इशारा देवुन थांबण्याचा इशारा दिला असता त्याने मालट्रक न थांबविता तो धुळे कडे जोरात पळून गेला तेव्हा त्याचा पाठलाग करुन त्यास सावळदे गावाचे अलीकडे थांबविले. सदर गाडीवर चालक व क्लीनर यांना त्याचे नाव गाव विचारता तेव्हा चालक याने त्याचे नाव | प्रल्हादसिंग जसवंतसिंग यादव वय-३९ रा. पावाया ता. बानमोर जि.मुरेना, मध्यप्रदेश व क्लिनर याने त्याचे | नाव मलखानसिंग करनसिंग परिहार वय २८ रा. गुरावर ता. शिवपुरी जि. शिवपुरी, मध्यप्रदेश असे | सांगितले. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना वाहनासह पोस्टेला आणुन त्याचे वाहनातील माल | खाली करुन पाहिला असता चप्पल व खेळण्यांचा मालाचे खोकयाचे अडोशाला मध्यभागी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले वाह पानमसाला व तंबाकुजन्य अन्नपदार्थ लपविलेले ८० गोण्या मिळून आल्या आहेत.तो माल खालील प्रमाणे

१) २७,६४,८००/- रुपये किमतीचा मालाच्या ८० तपकीरी रंगाच्या गोण्या प्रत्येक गोण्यात वाह पानमसाला पॅकचे २ सफेद रंगाचे लहान गोणी प्रत्येकात १२८ पॅक असे दोन्ही गोणी मध्ये २५६ पॅक व W CHEWING TOBACCO च्या पॅकचे २ हिरव्या प्रत्येकी कि. १५/-रुपये

रंगाचे लहान गोण्या प्रत्येकात १२८ पॅक असे दोन्ही गोणी मध्ये २५६ पॅक प्रत्येक पानमसाला व तंबाकुचे पॅक मध्ये ३४ लहान पाऊच असुन ८० गोण्यामध्ये एकुण २०४८० वाह पानमसाल्याचे पॅक प्रत्येकीकि. १२०/- रुपये व २०४८० तंबाकुचे पॅक

२) १५,००,०००/- रुपये किमंतीचा मालट्रक क्रमांक RJ11 GB8594 जु.वा. कि.अं.

४२,६४,८००/- रुपये एकुण (बेचाळीस लाख चौसष्ट आठशे रुपये)

वर नमुद आरोपी विरुद्ध शिरपुर तालुका पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर श्री. अनिल माने व पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत स्था.गु.शाखा धुळे यांचे मार्गदर्शना खाली सपोनि/सुरेश शिरसाठ, पोसई / नरेंद्र | खैरनार, असई/ लक्ष्मण गवळी, असई/नियाज शेख, पोहेकॉ/ संजय देवरे, संजय धनगर, सईद शेख, पोकॉ/योगेश मोरे, मुकेश पावरा व कृष्णा पावरा यांचे पथकाने केली असुन गुन्हयाचा पुढील तपास | सपोनि / सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने