खर्दे विद्यालयात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरा




 तालुक्यातील आर .सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे बु. येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर . साळुंखे होते. सुरुवातीला श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रदीप साळुंखे यांनी केले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमोल सोनवणे यांनी श्रीनिवास  रामानुजनचे महत्व पटवून देऊन त्यांच्या बालपणातील अनुभव कथन केले. गणित शिक्षक डी. एम .पवार यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या सिद्धांत व प्रमेय या विषयी माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.आर. साळुंखे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व विषयाची व्यापकता या बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पी.आर .साळुंखे,पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी एम पवार,बी एस बडगुजर, पी. एस. अटकळे, बी एस पावरा, सीमा जाधव, सुनंदा निकम,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जे. पाटील यांनी केले. व आभार प्रदर्शन सीमा जाधव यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने