धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता साहाय्य (आत्मा) व कृषी विभाग, शिरपूरअंतर्गत सुळे येथे कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच झाला. कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ. रोहित कडू यांनी शेडनेट, पॉली हाऊस, ग्रीन हाऊसमधील पीक संरक्षण, लागवड तंत्रज्ञान, तालुका कृषी अधिकारी विशाल मोटे, सांगवीचे मंडळ कृषी अधिकारी आर. डी. मोरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. सरपंच शिकराम पावरा, उपसरपंच शिवलाल पावरा, मंडळ कृषी अधिकारी सुधीर ईशी, प्रज्ञा प्रकाश मोरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण वाघ, आर. वाय. पटेल, पी. पी. कदम, के. आर. चव्हाण, पोलिसपाटील सीताराम पावरा आदी उपस्थित होते.
Tags
news
