धुळे, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र परवान्यास ऑनलाइन संगणक प्रणालीवर (NDAL) ओळख क्रमांक प्राप्त करून घेतलेला नसेल, अशा शस्त्र परवान्याचा ओळख क्रमांक (UIN) प्राप्त करून घेण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत आवश्यक त्या माहितीसह संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
धुळे जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवाना धारकांनी अद्यापपर्यंत धारण केलेल्या शस्त्र परवान्यास UIN क्रमांक प्राप्त करून घेतलेला नसेल, अशा शस्त्र परवानाधारकांनी शस्त्र नियमानुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन NDAL-ALIS या संकेतस्थळावर माहिती भरणे बंधनकारक असून त्यांनी शस्त्र परवान्यास ओळख क्रमांक (UIN) प्राप्त करून घ्यावा. NDAL-ALIS या प्रणालीवर ज्या शस्त्र परवानाधारकांची नोंद राहील तेच परवाने 31 डिसेंबर 2021 नंतर सुरू राहतील. नोंद नसणारे, ओळख क्रमांक नसणारे शस्त्रांचे परवाने रद्द ठरविण्यात येतील, असेही नमूद करण्यात आले आहे
Tags
news
