मा.मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांची प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या कोव्हिड लसीकरणाला भेट




शिरपूर - कोव्हिड प्रादुर्भाव काळापासून व त्यानंतरही कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणात सर्वसामान्य जनते पर्यंत जावुन त्यांचे गैरसमज दुर करुन त्यांना लसीकरणासाठी तयार करण्यात आदिवासीबहुल व दुर्गम भागातील प्रा.आ.केंद्रांचा फार मोठा वाटा आहे.
कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यानंतर आदिवासीबहुल भागात लसीकरणास अत्यल्प प्रतिसाद होता,आरोग्य यंत्रणेच्या कठोर परिश्रमा नंतर बहुतांश लोक तयार झालीत पंरतु तरीही कोव्हिड प्रादुर्भाव ओसरताच लोकांनीही लसीकरणाकडे पाठ फिरवली.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे श्रीमती वान्मती सी यांनी वरील बाबींची दखल घेत तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणाची सांगड घालत तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीवरील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कमी लसीकरण झालेली गाव ,पाडे निवडुन लसीकरण कृतिआराखडा तयार केला व प्रत्यक्ष अंमलातही आणला.
त्याच्याच अनुषंगाने काल प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या लाकड्याहनुमान तसेच भोईटी यांगावी प्रत्यक्ष लसीकरण सत्राला भेट दिली.दोन्हिठिकाणि त्यांनी गावातील उर्वरित लोकांचा पहिला डोस लवकरात लवकर पुर्ण करुन दुसरा डोस ही लोकांनी लवकरात लवकर घ्यावा अशा सुचना दिल्यात.
प्रा.आ.केंद्र रोहिणिलाही मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संतोष नवले यांच्यासोबत भेट दिली व प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या कामकाजाची विचारपूस केली.मागील पाच वर्षांत कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पुर्ण नव्हते या वर्षी मात्र डिसेंबर अखेरच 216 स्त्रि शस्त्रक्रिया करुन वार्षिक उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमांनी सर्व कर्मचारीवर्ग व सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनंदन केले.संस्थेतील प्रसुतिचे प्रमाण चांगले असुन रोहिणि केंद्रा मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व आरोग्य सेवेबद्दल व विशेषत इमारतीच्या अंतर्गत स्वच्छतेबद्दल अंत्यत समाधान व्यक्त केले.
कोव्हिड लसीकरणात प्रा.आ.केंद्र रोहिणिचा पहिला डोस चे प्रमाण फक्त 71% एवढे झालेले आहे ,तर ते येत्या पंधरादिवसात किमान 90% करण्याच्या व त्याचबरोबर दुसरा डोस वाढविण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात.
रोहिणि प्रा.आ.केंद्राचे प्रथम वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.मा.तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.राजेंद्र बागुल व सर्व कर्मचारीवर्ग प्रा.आ.केंद्र रोहिणि यां वेळेस उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने