शिरपूर - आज दि. 31 रोजी नेहरु युवा केंद्र धुळे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांचे अंतर्गत ग्रामपंचायत वरझळी (ता. शिरपूर) येथे कैच द रेन (Catch The Rain) उपक्रम राबविण्यात आला.
पाणी आपल्यासाठी जिवन आहे. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो परन्तु ते पाणी जमिनीवरून वाहून जाते व ते आपण जमिनीमध्ये मुरव्वत नाही. तसेच नैसर्गिकरित्या जमिनीत मुरण्याचे मार्ग ही बंद केलेत त्यामुळे आपल्याला या परिस्थितीतून बाहेर जायचे आहे. यासाठी आपल्याला पडणारे पाणी "गावाचे पाणी गावातील जमिनीमध्ये व शेतातील पाणी जमिनीमध्ये त्याचा भरना झाला पाहीजे.
तसेच पावसाळ्याचा पूर्वी गाव स्तरावर कोण कोणती कामे जल संधारण करावी. त्याचे नियोजन कशा प्रकारे करावा. गावातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी विविध उपाय योजनेवर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात पाणी आडवा पाणी जिरवा या साठी शपत व पोस्टर लावण्यात आले. या उपक्रमात नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक गणेश चौधरी व युवा स्वयंसेवक तथा सरपंच सेवा महासंघाचे महिला अध्यक्ष प्रियंका अरविंद पावरा व सरपंच दिलीप पावरा, उपसरपंच साहेबराव भील, ग्रामसेवक के के जाधव, ग्रामपंचायत सदस्य सखाराम पावरा, राजेश पावरा व इतर नागरिक उपस्थित होते.
Tags
news
