दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये भारतात रोटरी स्कूलसह २००० पेक्षा जास्त शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लीड स्कूल शिक्षणप्रणालीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशू शाह यांच्या अध्यक्षतेखाली 'लीड स्कूल पॅरेंटस् ओरिएन्टेशन' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्राचार्य श्री एम. पी. पवार,लीड स्कूलचे समन्वयक श्री कृष्णा पाटील, इंचार्ज बतुल बोहरी, पालकवर्ग व शिक्षक उपस्थित होते.
श्री कृष्णा पाटील म्हणाले की, रोटरी स्कूलमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुकूल असलेली लीड स्कूल शिक्षणप्रणाली भारतात रोटरी स्कूलसह 400 पेक्षा जास्त शहरांमध्ये व 2000 पेक्षा जास्त शाळांमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या शिक्षणप्रणालीचा लाभ घेत आहेत. लीड शिक्षणप्रणाली परीक्षेपुरती मर्यादित नसून विदयार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे.ऑडियो,व्हिडिओ, पाठ्यपुस्तक, फळा, टॅबलेटच्या माध्यमातून मूळ संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांत विषयाची पायाभरणी केली जाते.विदयार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीचा विचार करून कौशल्य विकासावर भर दिला जातो.पारंपरिक अध्यापन पद्धतीत सुधारणा करून प्रात्यक्षिक कार्याद्वारे विदयार्थ्यांच्या कृतीशिलतेला व विचारशिलतेला वाव दिलेला असतो. इंग्रजीत सुधारणा होते, शब्दसंपत्ती वाढते, विद्यार्थी स्वतः कविता,निबंध लिहू शकतात. गणित,विज्ञान व सामाजिक शास्त्र शिकण्याच्या उत्तम पद्धती आहेत. याबरोबर लीड शिक्षणप्रणालीत मूल्यशिक्षण व व्यावहारिक कौशल्यावर भर दिला जातो. लीड शिक्षण देणारे शिक्षक प्रशिक्षित असतात. त्यांना बदलत्या काळानुरूप ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. विदयार्थी लीड स्कूल अॅपद्वारे शाळेत शिकलेला अभ्यास घरीसुद्धा करू शकतात. होमवर्क पूर्ण करून फिडबॅक घेऊ शकतात.पालकांसाठी वेगळा विभाग असतो. पालक घरी बसल्या लीड अॅपद्वारे मुलांची शैक्षणिक प्रगती जाणून घेऊ शकतात,शाळेतील उपक्रमांचे फोटो पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीची लीड शिक्षणप्रणाली रोटरी स्कूलच्या विदयार्थ्यांना स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी उपयुक्त ठरेल.
श्री हिमांशू शाह अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आपल्या
रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अधिकाधिक वाढ व्हावी,म्हणून सीबीएसईच्या अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानणाऱ्या शिक्षणप्रणालीचा वापर केला जात आहे . यात पालकांच्या अभिप्रायाचाही विचार केलेला असतो. पालकांना पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी संपूर्ण माहिती दररोज मिळत असते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपमाला ठाकूर व राहुल भावसार यांनी केले.
Tags
news