सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त धुळ्यात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन




- सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि.२ जानेवारी रोजी धुळे शहरातील गरुड वाचनालयात 'शब्दयोद्धा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले असून जास्तीत महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सलग स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,चषक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी दिली.
     वक्तृत्व क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन युवकासाठी युवकमित्र परीवारामार्फत दरवर्षी शब्दयोद्धा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध विषयांवर विचार मांडण्यासाठी विषय देण्यात येतात.कोणत्याही एका विषयांवर उत्कृष्ट भाषण करणाऱ्या वक्त्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय,उत्तेजनार्थ अशी पारितोषिके म्हणून रोख रक्कम,शब्दयोद्धा चषक व सन्मानपत्र देऊन गौरविले जाते.महाराष्ट्र राज्यातील युवा वक्त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रवीण महाजन,प्रसाद जगतात,सागर शितोळे,ऋतुजा जगदाळे,रोहित ठाकूर यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने