नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातील दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना अखेर सील, पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांचे नागरिक,यांनी मानले आभार. नाशिक शांताराम दुनबळे.



                नाशिक शांताराम दुनबळे.

 नाशिक= भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली येथे तब्बल दीडशे वर्षापूर्वीचा कुंटणखाना अखेर पोलिसांनीअखेर सील केला . पोलिस कारवाई करत असताना येथील रहिवाशी महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता . पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रहिवाशी महिला शांत झाल्या . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी विशेषतः धार्मिक स्थळ , शाळा महाविद्यालये , बाजारपेठ , बससस्थानके , शासकीय खासगी दवाखाने , रेल्वे स्थानक आणि हॉटेल परिसराच्या २०० मीटरच्या परिसरात अनैतिक व्यवसाय, अवैध धंदे करण्यास बंदी घातली होती . तसेच शहरातील विविध भागातील चालू असलेल्या कुंटणखान्यांची माहिती शहरातील पोलिस ठाण्यांकडून मागवली होती . भद्रकाली परिसरातील ठाकरेगल्ली भागात काही घरांमध्ये बेकायदेशीररीत्या कुंटणखाना सुरू असल्याचा अहवाल भद्रकाली पोलिसांनी पोलिस आयुक्तांना पाठवला होता . हा कुंटणखाना बंद करण्यासाठी संबंधित रहिवाशांना नोटीस देण्यात आली होती . मात्र रहिवाशांनी नोटिसीला प्रतिसाद न दिल्याने पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी संबंधित कुंटणखाना सील करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले . त्यानुसार गुरुवारी ( दि . ९ ) दुपारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पंवार , पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर खांडवी , प्रणिता पवार , जितेंद्र माळी यांच्यासह पोलीस पथकाने गजबजलेला कुंटणखाना सील केला . तेथील रहिवासी महिलांना घरातील सामान बाहेर काढण्यासाठी वेळ देण्यात आला होता . परीसरातील अनेक व्यावसायिकांनी पोलिस खाते यांचे मानले आभार,.                             दीडशे वर्षांपासून हा कुंटणखाना सुरू होता . आंबट शौकिन , गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येत होते . खुनासारखे गंभीर गुन्हे घडले असल्याने येथील पारंपरिक व्यावसायिक त्रस्त झाले होते . काही तर मालमत्ता विक्री करून दुसरीकडे स्थलांतरित झाले  होते.अखेर पोलिसांनी हा कुंटणखाना सील केल्याने अनेक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने