शिदखेडा तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच बेबाबाई अशोक शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्या रिक्त पदी आज दिनांक २९/१२/२०२१ रोजी मांडळ ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच डोंगर बागुल यांच्या अध्यक्षतेखाली निवड घेण्यात आली. या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक २ मधील ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई सुदाम भामरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी होते सरपंचडोंगर बागुल यांनी मिनाबाई भामरे यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केले.
या निवड प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, गोविंदा देवरे, वसंत बापू मोरे, विजय मोरे, कल्पना पवार, बेबाबाई अशोक शिंदे उपस्थित होते. ही निवड बिनविरोध व्हावी म्हणून, ग्रामपंचायत गट नेता रामकृष्ण मोरे, बबन दादा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, संजय पाटील, परशुराम पिंपळे,मच्छिद्र ईशी,विजय मोरे,रावसाहेब शिंदे, मनोहर मोरे, रवींद्र पिंपळे, ज्ञानेश्वर पवार,गोविंदा अप्पा देवरे, वसंत मोरे, यासह मांडळ ग्रामस्थ व गावातील भाजपाचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सचिव म्हणून ग्रामसेविका, सौ एस. आर. गीते यांनी कामकाज पाहिले.
Tags
news
