थाळनेर (वार्ताहर):- शिपुर चोपडा रस्त्यावरील तरडी गावाजवळ सायंकाळी ५.३० वजेच्या सुमारास मोटार सायकल व चारचाकी वाहन यांच्यात सामोरा समोर अपघात होऊन दोन जण जखमी होऊन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की.आज दिनांक ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH 19 CV 4679 ही शिरपूर कडून चोपड्याकडे जात असताना चोपड्या कडून शिरपूर कडे जाणारी मोटार सायकल क्रमांक MH 18 BJ 0979 यांच्यात सामोरासमोर जबर धडक झाल्याने मोटासायकलस्वार १) लखा चिंधू पूर्ण नाव नाही व दुसऱ्याचे नाव नाही रा.आगरपाडा ता.साक्री दोघेही जबर जखमी होऊन अपघातातील वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे व बभळाज,तरडीचे ग्रामस्थानी धाव घेतली यावेळी घटनास्थळी जखमींना मदतकार्य करण्यासाठी बभळाजचे राजकुमार जैन,तरडी येथिल शिवसेनेचे कार्यकर्ते विभा जोगरणा व ग्रामस्थानी जखमी झालेले मोटासायकलस्वार यांना १०८ या वाहनाने उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले.यावेळी राजकुमार जैन यांनी जखमी झालेले लखा चींधु यांच्या खिशातील एक लाख चार हजार १३० रुपये थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या कडे सुपूर्द केले.रात्री उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते .पुढील जखमींना उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Tags
news