पिंपळनेर - पिंपळनेर पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीवर मोठी कारवाई करून
12लाख 90,000 चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक 30 डिसेंम्बर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पिंपळनेर पो.स्टे.हद्दीत नवापूर ते पिंपळनेर रोडवरून गोवंश जनावरांची अवैध रित्या वाहतूक होणार असलेबाबत गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना एक पथक तयार करून गोवंश वाहतूक करणारा टाटा कंपनीची मालट्रक क्र. MH.14.V.5696 ताब्यात घेतला असून त्यात 21 गोवंश जातीचे जनावरे मिळून आले आहेत.आरोपी ताब्यात घेण्यात आला असून, सदर जनावरे देऊर, ता.साक्री येथील चतुरमुथा पांजरपोळ एवं प्राणीरक्षक संस्था येथे पाठविण्यात आले असून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदरच्या कारवाईत Tata कंपनीची 1613 टर्बो मॉडेल ची मालवाहतूक ट्रक किंमत अंदाजे 10 लाख.,गोवंश जातीचे एकूण 21 जनावरे किंमत एकूण 2,90,000.असा एकूण मुद्देमाल 12 लाख 90,000.पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील ,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो, उविपो अधीक्षक प्रदीप मैराळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे ,पो ना विशाल मोहणे ,पो कॉ.चेतनसोनवणे,मकरंद पाटील,सोमनाथ पाटील,रविंद्र सूर्यवंशी ,नरेंद्र परदेशी इत्यादींच्या पथकाने केली आहे
Tags
news