सरकारने नाटकं बंद करावीत आणि ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत- श्रीमंत भूषणराजे होळकर प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज, इंदौर संस्थानाचे श्रीमंत भूषणराजे होळकर महाराज यांनी आज गेवराई येथीक एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या आंदोलनाला पाठिंबा दिला.

राजघराण्यात जन्माला येऊन सामान्य एस. टी. चालकांसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून टाळ वाजवत आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली . 

जेवढ सरकार ताणेल तेवढी या आंदोलनाची धार वाढत जाणार आहे. कारण ही लोक विचारांनी एक झाली आहेत. आणि क्रांती ज्यांनी घडवली त्यांच्या रक्ताची माणस या आंदोलनात सहभागी होत आहे.ही सरकारसाठी चेतावणी आहे.

"समजने वाले को इशारा काफी" आमचा अंत बघू नका निर्णय घ्या नसता आम्ही या प्रश्नाबाबत निष्क्रिय आहोत हे तरी एकदाच सांगून टाका. असे मत भुषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने