पुणे :फोटोग्राफी क्षेत्रात सध्या नवनवीन कल्पकतेचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असून बाभूळगाव येथील महावीर आसबे यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायासाठी नवीन ड्रोन कॅमेरा घेतला असून आज नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी हा नवीन ड्रोन कॅमेरा चालवून फोटोग्राफीच्या अनुषंगाने त्यातील माहिती घेतली. युवकांनी कल्पकतेतून रोजगार निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कोरोना पार्श्वभूमीनंतर सर्वसामान्य परिस्थिती मूळ पदावर येत असताना युवकांनी आपल्या नवनवीन कल्पकतेचा वापर करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले तसेच त्यांनी महावीर आसबे यांच्या फोटोग्राफी व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
news
