प्रा.आ.केंद्र रोहिणि कर्मचारीवृंद लसीकरण मोहिमेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल





शिरपूर - मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व मा.जिल्हाआरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व मा.तालुका आरोग्य  अधिकारी यांच्या सहकार्यातून प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या आरोग्य कर्मचारीवृंद यांनी एकदिवसीय 1282  लाभार्थीना लसवंत केले.
सुरवातीच्या काळात लससाठा कमि व लोकांची मागणी जादा होती,परंतु जसे जसे कोव्हिड प्रादुर्भाव कमि होत गेला तस-तसे लोकांचा लसीकरणाचा उत्साहही कमी झाला.
16 जानेवारी पासुन ते सलग नोव्हेंबर पर्यंत म्हणजे गेल्या अकरा महिन्यापासून सर्व आरोग्य कर्मचारीवर्ग यांनी लसीकरण कामासाठी स्वताला वाहुन घेतले आहे.आहे त्या उपलब्ध मनुष्यबळावर व नाॅन कोव्हिड चे  दैनंदिनीचे सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासोबत लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच.परंतु आदिवासीबहुल भागात अजुनही अफवांचा जोर ,सोशल मेडियांत चुकिच्या पद्धतिने पसरलेले लसीचे परिणाम,तसेच लसीकरण हे ऐच्छिक आहे,म्हणुन आरोग्या विभागाचा आग्रह का ?अशा बर्‍याच गोष्टींना ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला तोंड द्यावे लागते आहेच.तसेच मजुर वर्गांचे वाढते स्थलांतर ,इतर विभागांचा दुरुन सहभाग त्यामुळेच सध्या काहींअंशी लसीकरणाचा वेग मंदावला होता.
त्याअनुषंगाने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांनी ग्रामीण भागातील व तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांच्या सहयोगाने दि 23 रोजी विशेष लसीकरण सत्र आयोजित केलेली होती.त्यासाठी दि.22 रोजी संपुर्ण ग्रामीण भागातील लोकांच्या जनजागृतीसाठी त्याभागातील शिक्षक,ग्रामसेवक,कृषिसहाय्यक  तलाठी,अंगणवाडीतील सेविका,आशास्वयंमसेवक व बचतगटांचे प्रतिनिधी,समाजोपयोगी संघटना ,लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनजागृतीकरुन लोकांचे गैरसमज दुर करुन त्यांना *हर घर दस्तक* मोहिमेत घरोघरी जावुन लसीकरण करण्यात आले.
प्रा.आ.केंद्र रोहिणि अंतर्गत अतिदुर्गम भाग पिरपाणि,टिटवापाणि,खुटमोडी या ठिकाणि मेहनतीने पोहचून लसीकरण करण्यात आले.
चिलारे,आंबे,हिगाव, खामखेडा,महादेव,आसरापाणि इत्यादी गावातील लोकांना जवळपास 1282 लाभार्थीनां लस देण्यात आली.
मा.मुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम वान्मथी सी यांनी चिलारे गावात प्रत्यक्ष लसीकरण सत्राला भेट देवुन वस्तुस्थिती जाणुन घेतली.आजच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन पुढिल 30 तारखेपर्यंत शंभरटक्के लसीकरण पुर्ण करण्याच्या सुचना दिल्यात.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेंद्र बागुल उपस्थित होते.
प्रा.आ.केंद्र रोहिणिचे वैद्यकीय अधिकारी यांनी झालेल्या कामाचा व नियोजित सत्रांचा गोषवारा सादर केला.तालुकासुपर वायझर श्री वानखेडे व श्री छोटु कोळी आज दिवसभर चिलारे येथे थांबुन होते.   
प्रा.आ.केंद्र रोहिणि येथिल सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारीवृंद यानी लसीकरण कामात स्वताला वाहुन घेतले आहे,काही ठिकाणि लसीकरणास सरळ नकार दिला जातो तरी प्रा.आ.केंद्र रोहिणिच्या वतिने सर्व जनतेला विनंती आहे की आरोग्य कर्मचारीवर्ग यांना सहकार्य करा व आपले घर आणि गाव स्वरंक्षित करा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने