शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद नियोजित कार्यक्रम आचार संहिता लागू झाल्यामुळे रद्द झाल्या बाबत मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत शिरपूर शहरात काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शिरपूर शहरातील स. नं. 60 या जागेवर 688 घरकुल कामांचा शुभारंभ बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता मुकेशभाई पटेल रिक्रिएशन गार्डन च्या मागे शिरपूर येथे संपन्न होणार होता.
परंतु, धुळे नंदुरबार विधान परिषदेची आमदारकीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे शासनाने आचारसहिता जाहीर केली आहे. यामुळे शिरपूर वरवाडे नगर परिषदेने आयोजित केलेला भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
Tags
news




