जामण्यापाडा येथे वनदाव्यांच्यावर चर्चासत्र



प्रतिनिधी, शिरपूर 
            शिरपूर तालुक्यातील मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनदाव्यांबाबत तालुक्यातील जामण्यापाडा येथे बिरसा फायटर्सच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे समस्यांवर चर्चा केल्या. 


               आदिवासी व पारंपरिक वननिवासी यांना देय असलेल्या वनदाव्यांच्या समस्यांवरील जामण्यापाडा येथील चर्चासत्रात भोईटीचे माजी पोलिस पाटील भोंग्या पावरा यांनी मार्गदर्शन करून, प्रसंगी आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष वसंत पावरा यांनी स्वत:ची लढाई तुम्हालाच करायची आहे. त्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी जमीन वाचवण्याचे आवाहन केले. तर राज्याध्यक्ष मनोज पावरा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्यांची नोंद करून घेतली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे समस्यांचा पाढा वाचला. आणि आंदोलनास सज्ज असल्याची ग्वाही दिली. यावेळी काकड्या पावरा, संघटक, बिरसा फायटर्स, भावसिंग पावरा माजी पोलीस पाटील, जामण्यापाडा, सुरेश पावरा, जगन पावरा, ढेमा पावरा, रमेश पावरा, भाईदास पावरा, वेरसिंग पावरा, रमेश पावरा, भावलाल पावरा, खुमसिंग पावरा बिरसा फायटर्सचे गेंद्या पावरा, हिरालाल पावरा , कैलास पावरा, सुभाराम पावरा, दिलीप पावरा, राहंग्या पावरा, लोट्या पावरा, संजय पावरा, चंपालाल पावरा व वनपट्टेधारक शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन विलास पावरा यांनी केले.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने