शहरातील मच्छीबाजार परिसरातील नागरिकांनी विरोध केल्यावरून जुन्या ताडी दुकानदारास जीवे मारण्याची धमकी





शिरपूर शहरात नवीन ताडी दुकानासाठी जागेची पाहणी करणाऱ्या व्यक्तीला मच्छीबाजार परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याच्या रागातून जुन्या ताडी दुकानदाराशिवीगाळ करीत परिवाराचे बरेवाईट व जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


          याप्रकरणी श्रीहरी  लिंगय्या यादवगिरीवार रा.कांशीराम नगर शिरपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे.दाखल फिर्यादीनुसार नंदुरबार येथील दिपक श्रीनिवास वंडीवार व त्याच्यासोबत 3 अज्ञात व्यक्तीं हे नवीन ताडी दुकाणासाठी  मच्छीबाजार परिसरात   2 ते 3 वाजेच्या सुमारास जागा शोधत असतांना नागरिकांनी विरोध केला.त्या रागातून मच्छीबाजार परिसरातील नागरिकांसमोरच  प्लॉट नंबर 2 च्या मोकळ्या जागी जुन्या ताडी दुकानाजवळ दीपक दिपक श्रीनिवास वंडीवार व त्याच्यासोबत 3 अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करून संपूर्ण परिवाराचे बरेवाईट करण्याची धमकी देत फिर्यादी श्रीहरी यादवगिरीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची  फिर्याद दाखल करण्यात आली दाखल फिर्यादीवरून दीपक श्रीनिवास वंडीवार रा.नंदुरबार व 3 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ नारायण मालचे करीत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने