शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय अखेर ते तीन काळे कायदे रद्द आज पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा




शिरपुर  - शेतकरी आंदोलनाचा विजय!!
आज आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी तीन कृषि काळे कायदे रद्द करण्याची घोषणा केली.
२६/११/२०२० पासुन संयुक्त किसान मोर्चाचा नेत्वाखाली  एक वर्षापावेतो आदोंलन करावे लागले ह्या ऐतिहासिक आंदोलनात जवळपास ६३१ शेतकरी शहिद झाले.लखिमपुर खेरीआदोंलनातील ४ शेतकरी १पत्रकार यांना अजय मिस्रा चा मुलगा आशिष मिस्रा याने अंगावर गाडी चडवुन ठार केले व १२ शेतकरी जखमी झाले एवढे रक्तरंजित आंदोलनाचा विजय झालेला आहे.
जगामध्ये कुठेहि एक वर्ष आंदोलन केलेले नाही.आदोलनातील शेतकय्रांना बदनाम केले गेले.आदोंलन चिरडुन टाकण्यासाठी व आंदोलनात फुट पाडण्यासाठी फार प्रयत्न केले.
शेतकरी संघटनांना ची एकता १९ विरोधी पक्षांनी दीलेला पाठींबा मुळे.शेतकरी आंदोलनाने घेतलेली टोकाची भुमिका हे आंदोलन यशस्वी  करण्यास महत्वाची ठरली.
आंदोलनातील मुख्य मागणी सरकारने माण्य केली असली तरी.
हमी भावाचा कायदा,प्रस्तावित विज विधेयक बिल रद्द करणे.
४ कामगार संहिता रद्द करणे.
ह्या संयुक्त किसान मोर्चाचा मागण्या मान्य झाल्या नाहित.
 ह्या मागण्या शेतकरी संघटना लावुन धरतील..
आपल्या शिरपुर तालुक्यात किसान सघंर्ष समन्वय समितीतर्फै संयुक्त किसान मोर्चाचा आदेशा प्रमाणे मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला,महामाहिम राष्ट्रपती पासुन ते तहसिदारा पर्यन्त अनेक निवेदने देऊन आंदोलने केलीत.
यामध्ये ८ डीसेंबर २०२० रोजी,भारत बंद,२२डीसेबंर किसान जथ्थाचे स्वागत,सभा.व मुक्काम,२७/९/२०२१ भारत बंद शिरपुर येथे. निवेदन देऊन सांगवी येथे रस्ता रोको.११/१०/१/२०२१ रोजी महाराष्ट बंद,०८,०९/११/२०२१ रोजी कलश यात्रेचा सभा व स्वागत अशा प्रकारे.
किसान संघर्ष समीतीनेआदोलने यशस्वी केलीत.
या आंदोलनात ,म.रा.किसान सभा,शेतमजूर युनियन,महाविकास आघाडीचे घटक पक्ष,भा.क.पक्ष,सत्यशोधक जन आदोंलन, धुळे जिल्हा जाग्रृत मंच,बिरसा फायटर्स,आदिवासी एकता,संभाजी बिर्गेड,इत्यादि संघटना सहभागी घेतला  व पत्रकार बधुंनी साथ दिली ..
सर्वांचे जाहिर आभार.
शेतकरी एकता झिंदाबाद!!!

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने