'दुष्कर मार्गपर सुलभता से चलना है' - मुमुक्षू कु.श्रुती नागसेठीया
श्री.वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ होळनांथे यांचे तर्फे होळनांथे येथे ता.१९.११.२०२१ शुक्रवार रोजी आयोजित मोठ्या उत्साहात वरघोडा मिरवणूक संपन्न झाली.
अ.भा.रत्नहितैषी संप्रदायाचे आचार्य प्रवर प.पू.श्री.हिराचंद्रजी महाराज साहेब यांच्या सान्निध्यात होळनांथे येथील श्री.हुकुमचंदजी मोतीलालजी नागशेटीया यांची नात , श्री.सागरशेट जैन यांची मुलगी कु.मुमुक्षू श्रुती ही बाल्यवयात दिक्षा घेणार आहे.वैराग्यमुर्ती श्रुतीला बालपणापासूनच जैन धर्माचे संस्कार असून धार्मिक पाठांतर, साध्वीजींच्या सान्निध्यात राहून अनेक गोष्टींचे ज्ञान तिने प्राप्त केलयं.
ता.९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थान राज्यातील पिपाड शहरात सदर दिक्षा ग्रहण कार्यक्रम संपन्न होणार असून त्यादृष्टीने कुमारवयातच दिक्षा घेणार असल्याने जिनशासन मधील या समर्पण भावनेबद्दल गावोगाव कौतुकाचा वर्षाव वरघोडा मिरवणूक व अभिनंदन समारोह च्या माध्यमातून दिसून येतोय.
होळनांथे येथे सुद्धा आज रोजी खुल्या जीप मधून सकाळी १० वाजे पासून पियुषशेट जैन यांचे घरापासून वरघोडा मिरवणूक सुरु होवून जैन स्थानक पर्यंत घोषणांच्या आवाजात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
तदनंतर स्थानक भवनात अभिनंदन सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी बहुसंख्य समाजबांधव स्री पुरुष मुले हजर होते.यावेळी होळनांथे श्री संघ तर्फे संघपती श्री.बन्सिलालजी संचेती यांनी संचलन करताना मुमुक्षू श्रुती उर्फ केशर हिचा संघ तर्फे सत्कार सन्मानपत्र देवून पवनलालजी सेठीया व चंद्रकलाबाई यांचे हस्ते करण्यात आला.तसेच विरपिता, विरमाता , विरदादा व विरदादी, परीवार आदि यांचाही सत्कार संघतर्फे समाजबांधव यांचेकडून करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांनी ही सत्कार केला.
जि.प.सदस्य श्री.संजय पाटील सर व श्री.सुवालालजी ललवाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आशिर्वाद प्रदान केले.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना मुमुक्षू श्रुती ने प्रामुख्याने सर्वांचे आई, वडील,दादा,दादी सह परीवार समाज आदिंचे अनंत उपकार मानले व जैन धर्माबद्दलचे असणारे मर्म प्रकाशित करतांना माझे पुढील जीवन हे संयमी लाईफ असेल.आजवर मला एकच आईवडील होते मात्र दिक्षा घेतल्यावर सर्वच अम्मा पिया होणार असे सांगितले.दिक्षा नंतर कोणाशीही वैर ची गाठ राहू नये म्हणून सर्वांची क्षमायाचना केली.होळनांथे श्रीसंघ बद्दल आदरभावना व्यक्त केली.
कार्यक्रम पश्चात नवकारसी भोजनचे लाभार्थी श्री.पियुष हुकुमचंदजी नागसेठीया यांचेकडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी होळनांथे श्री.संघचे संघपती श्री.बन्सिलालजी संचेती समवेत सर्व संघ सदस्य तसेच श्री.गुरु कन्हैय्या मंडळचे सर्व सदस्य तसेच सुशिल बहु मंडळ आदिंसह सर्वांनी परीश्रम घेतले.
Tags
news