शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वतीने दर बुधवारी "नो वेहिकल डे" पाळण्याचे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे आवाहन




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वतीने दर बुधवारी "नो वेहिकल डे" पाळण्यात येत असून युवक, युवती, नागरिकांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी होऊन प्रतिसाद द्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांनी केले आहे.


पर्यावरणाचा समतोल राखणे व प्रदूषणमुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणेकामी राज्य शासनाने "माझी वसुंधरा" हे राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानात शिरपूर शहर देखील सक्रिय सहभागी आहे.
नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूरक उपक्रम स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर शहर निर्मिती तसेच प्रदूषणमुक्त हवेच्या उपलब्धतेसाठी "हरित शिरपूर शहर" ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक आठवड्यातील बुधवार हा "नो वेहिकल डे" म्हणून पाळायचा निर्धार करण्यात आलेला आहे.


शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर दिवशी प्रदूषण रहित वाहन, इलेक्ट्रिक बाईक, सायकल इत्यादीचा वापर करावा. शक्यतो पायी प्रवास करावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरीशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल, मुख्याधिकारी तुषार नेरकर, सर्व सभापती, 
नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने