शिरपूर — वरवाडे वार्ड नं.१३ सर्व परिसरातील घराजवळ जे निकामी डमी पोल उभे होते नागरीकांना त्या डमी पोलची अडचण येत होती तरी नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांचे प्रतिनिधी संतोष महारु माळी व वसंत ज. माळी,आशा वर्कर वैशाली बुवा यांनी अधिकारींना निवेदन दिले होते त्या निवेदनाची अंमलबजावणी झाली व ते वीज डमी पोल काढण्यात आले यात महावितरण वीज कंपनी शिरपूर शहर उपकार्यकारी अभियंता डी.एम.पाटील साहेब,महावितरण वीज कंपनी साहयक अभियंता सचिन पाटील साहेब यांनी वरवाडे परिसरातील फुले पुतळाजवळ एक व संत सावता माळी चौक जवळील एक तसेच सावित्रीबाई फुले नगरातील दोन असे चार डमी वीज पोल काढण्यात आले यात नगरसेवक दिपक महादु माळी यांचेही सहकार्य लाभले तसेच या कार्यास वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी,पवार योगेश वायरमण यांचे ही सहकार्य लाभले तरी महावितरण वीज कंपनी शिरपूर शहर साहेबांचे वार्ड नं.१३ वरवाडे ग्रामस्थातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Tags
news
