शहादा येथील एस.टी महामंडळाचे राज्य शासनाच्या विलीनीकरनाच्या माणगीसाठी एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण व आंदोलन सुरू आहे अश्या या आंदोलनास भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार जिल्हाच्या वतीने नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
एस.टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंब मिळणारे वेतन आर्थिक समस्या मुळे ३० हुन अधिक कर्मचाऱ्यांने केलेली आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभरामुळे कर्मचाऱ्यांचा मनात अविश्वास निर्माण झाला आहे. आणी आज त्या अविश्वासाचा भडका उडाला आहे. आज एस.टी कामगार जगला तर एस.टी जगेल हे समजून घेण्याची महाराष्ट्रा शासनाला गरज आहे. असे जिल्हाध्यक्ष सामुद्रे उपोषण कर्त्यांना असे मनोगत व्यक्त करीत सामुद्रे यांनी पाठींबा दिला. सोबत अमेय राजहंस, दीपक लोहार, योगेश सोनार, दीपक खेडकर, दिनेश नेरपगार, गोपाळ कोळी आदी कार्यकर्ते व व एस टी कर्मचारी सोबत होते.
Tags
news
