दोडाईचा येथे एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी 'लढा विलीनीकरणाचा' या मागणीवर ठाम असणाऱ्या एस टी.कर्मचाऱ्यांनी आज तीसर्यी दिवशी संप कायम ठेवला आहे.
या संपाला वेगवेगळ्या संघटनाचे
पाठींमबे दर्शविले आहे . दोंडाईचा आगारामध्ये आज दिनांक १० रोजी कामगारांनी संपाचे हत्यार उचललेले असून त्यांची प्रमुख मागणी ही राज्य शासनात विलीनीकरण करणे ही आहे आज तिसरा दिवस संपाचा दोडाईचा आगारांमध्ये होता तरी सर्व कामगारांनी एकजुटीने एकत्र राहून आंदोलनास पाठिंबा दर्शविलेला आहे तरी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामगार हा संप मागे घेणार नाही असे वक्तव्य सदर कामगारांनी केलेले आहे
यांनी आज संपकऱ्याची प्रत्यक्ष संघटनेने भेट घेतली.यावेळी देखील उपस्थित होते.माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख यांनी आपल्या भाषणात एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी संघटनेचे वतीने संपाला पाठिंबा दिला असून या आशयाचे पत्र पाठवले असल्याचे काॅम्रेड नाना पाटील यांनी सांगितले.
सर्व कामगार संपात सहभागी झाले आहेत यात इंटक, सेना कामगार संघटना देखील सहभागी आहेत.
वसंत कोळी.जिजाबराव कुवर, बापू महाजन,कैलास सावंत, नथा गिरासे,देवेंद्रसिंग राजपूत, किशोर वाघ, संतोष चव्हाण,उदय पवार, नरेंद्र भाबड, सचिन बाविस्कर, ललित पवार, शामराव पाटील, भरत पाटील, संतोष गोसावी, अशोक कोळी, वाल्मिक पाटील, किशोर पाटील, मडावी,आबा कोळी, दिनेश चारसे आदी उपस्थित होते.
Tags
news
