शिरपूर - कार्तिक शुक्लपक्षे ८ ( गोपाष्टमी ) वार गुरुवार दि.११ नोव्हेंबर २०२१ ह्या शुभ - दिवशी श्रीराम मंदिर देवस्थान ( श्री भोंगे ) शिरपूर येथे महंत सतिषदास महाराज भोंगे मठाधिपती श्रीराम मंदिर देवस्थान शिरपूर यांचे अध्यक्षखाली वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य - १० वा वर्धपानदिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. उपस्थित संत,महंत यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येऊन वारकरी संगीत भजनाच्या मंगलध्वनीने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सुरुवातीला भागवताचार्य,गौ - सेवक,वेदपारंगत प्रमोद महाराज भोंगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना विषद केली.कार्यक्रमासाठी भागवताचार्य प्रकाश महाराज माळी यांची विशेष उपस्थिती होती.त्यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या कार्याची विशेष माहिती व महत्व सविस्तरपणे विषद केले.सदर प्रसंगी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य शिरपूर ता.अध्यक्ष ह भ.प.संजय वामन चव्हाण रा.अर्थे,उपाध्यक्ष त्रंबक नाना पाटील रा.करवंद,आध्यात्मिक समन्वय आघाडी शिरपूर ता.अध्यक्ष बापु मोतीराम पाटील रा.बलकुवे,उपाध्यक्ष संतोष महारु माळी रा.वरवाडे -- शिरपूर,श्री बाळासाहेब पाटील,श्री नारायण पाटील,डॉ.आमले, श्री बडगुजर सर,श्री दिलीप पाटील,श्री भानुदास मोरे,श्री गजानन चौधरी,श्री परमेश्वर पाटील,श्री नंदकिशोर जैन,श्री सागर जैन,श्री अशोक सोनार,श्री गोविंद मोरे,चि. प्रथमेश भोंगे,श्री सुधाकर पाटील,श्री हनुमंत पाटील,शिवाजी गुजर,श्री नथा महाराज,श्री जितेंद्र शिंपी,श्री प्रकाश माळी,श्री राजेंद्र मराठे असे अनेक शिरपूर तालुक्यातील टाळकरी, माळकरी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे नियोजन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य शिरपूर ता.अध्यक्ष ह.भ.प.संजय वामन चव्हाण रा.अर्थे,उपाध्यक्ष ह.भ.प.त्रंबक नाना पाटील रा.करवंद तसेच श्रीराम मंदिर देवस्थान ( श्री भोंगे ) यांचेकडून सुंदर रितीने करण्यात आले होते.पसायदान म्हणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags
news


