शिरपूर/प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची धुळे विभागीय बैठक शिरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी अमरावती येथे ५ डिसेंबर रोजी होत असलेल्या अधिवेशनासंदर्भ चर्चा करून शिरपूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा सचिव सुनील गवळी, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कढरे, धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर, लक्ष्मण बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिरपूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी जयेश पाटील (शिरपूर) यांची तर शिरपूर तालुका अध्यक्षपदी योगेश पाटील (होळनांथे) उपाध्यक्षपदी अनिल भोई (शिरपूर) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका सरचिटणीस पदी दिलीप पाटील (ताजपूरी), तालुका प्रसिद्धीप्रमुख बबलू परदेशी (होळनांथे), कोषाध्यक्ष रवीप्रकाश भावसार (शिरपूर) कार्यअध्यक्ष पदी नितीन जाधव (शिरपूर) कार्यकारणी संचालक दिलीप पाटील (विखरण) आदींची नियुक्ती करण्यात आली. तसेच लवकरच तालुका व शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ रोप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत असून ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय खुले अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशनास जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान धुळे जिल्हाअध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले. तर पत्रकार बांधवांसाठी अपघाती व मेडिक्लेम विमा काढणे जिल्ह्यातील मुख्य दवाखान्यात पत्रकार बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करणे यासंदर्भ संघातर्फे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सचिव सुनील गवळी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश पाटील यांनी केले.
Tags
news


