जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील कलावंतांनी शुद्धता गँरन्टेड अर्थात....पाणी या एकपात्री प्रयोगाला दिली सदिच्छा भेट...!






प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडून         
बोरिवली - प्रबोधनकार नाट्यगृह, बोरिवली येथे शुक्रवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ८.०० वाजता संपन्न झालेल्या रंगसारंग प्रस्तुत आणि प्रमोद शेलार लिखित-अभिनीत-दिग्दर्शित शुद्धता गँरन्टेड अर्थात....पाणी या एकपात्री दिर्घांक प्रयोगाला
जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार साक्षी नाईक (व्यक्तिरेखा - गिरिजा) आणि प्रज्ञेश डिंगोरकर (व्यक्तिरेखा - मोरोबा) यांनी दिली सदिच्छा भेट.याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद शेलार, महेंद्र दिवेकर, दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, दिग्दर्शक विठ्ठल जाधव, रंगभूषाकार अनिल कासकर आदी कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने