औषध निरीक्षक परीक्षेसाठी असलेल्या अनुभवाची अट काढून विद्यार्थ्यांना खरा न्याय द्यावा अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य





शिरपूर - महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या  औषध निरीक्षक परीक्षेसाठी  असलेल्या अनुभवाची अट  काढून विद्यार्थ्यांना खरा न्याय द्यावा अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी मागणी केली आहे.
औषध निरीक्षक (drug inspector) या होणार या परीक्षेसाठी अनुभवाची अट कायमस्वरूपी काढणे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या परिपत्रक आतून 87 औषध निरीक्षक ( drug inspector) या होणारा परीक्षेसाठी महाराष्ट्र मध्ये जी अनुभवाची अट आहे  ती कायमस्वरूपी काढायला पाहिजे कारण त्या अनुभवाच्या अटीमुळे  आज 95 टक्के विद्यार्थी एक्झाम ला  औषध निरीक्षक या पदासाठी होणाऱ्या एक्झाम साठी पात्र होऊ शकत नाहीत  तसा विचार केला तर बाकीच्या राज्यांमध्ये  बी फार्मसी झाल्यानंतर ड्रग इंस्पेक्टर चे एक्झाम देता येते उदाहरणात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांमध्ये अनुभवाची अट नाही . महाराष्ट्र मध्ये सध्या सध्याच्या परिस्थितीला औषध निरीक्षक यांच्या 87 जागा निघाले आहेत त्या जागेसाठी विद्यार्थ्यांकडे अनुभव नसल्यामुळे 90 टक्के विद्यार्थी  परीक्षेला मुकणार असे चित्र दिसून आले आहे त्यामुळे सध्याचे अन्न औषध प्रशासनाचे मंत्री असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून तात्काळ तोडगा काढावा  व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असे आव्हान अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र तर्फे करण्यात आला आहे या विषयावर योग्य ते तोडगा न निघाल्यास  महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र तर्फे देण्यात आला आहे   असे पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश सचिव रोहित वाघ यांनी सांगितला आहे. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढून विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा असे त्यांनी म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने