अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान ने जपली सामजिक बांधीलकी!!!



अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान मागील १३  वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे. संस्था शैक्षणिक  कार्यातअग्रेसर असून आतापर्यंत १७००० शैक्षणिक मदतीचा लाभ उपलब्ध करून दिला आहे. चेंबूर पांजरपोळ येथील पडीत वास्तूचे बांधकाम करून तेथील मुलांना या वास्तूचा विविध प्रकारे लाभ व्हावा या सामाजिक उद्देशाने संस्था ' अक्षरा स्कूल' या संकल्पनेतून  नियोजन करणार आहे.!!!

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान च्या अक्षरा स्कूल चे उद्घाटन पांजरपोळ,चेंबूर मुंबई येथे शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज यांच्या शुभहस्ते व सरचिटणीस श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सदर उपक्रम अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष व शिव सामर्थ्य सेनेचे मुंबई सरचिटणीस श्री.अमोल वंजारे यांच्या संकल्पनेतून अक्षरा स्कूल हा उपक्रम संस्था राबवित आहेत लहान मुलांसाठी बालवाडी, मोठ्या मुलांसाठी अभ्यासिका, वाचनालय वगैरे विविध उपक्रम या जागेत होणार आहेत.या उद्घाटन प्रसंगी श्री.संदीप भोज यांच्या वतीने अक्षरा स्कूल साठी दोन पंखे भेट देण्यात आले त्यावेळी शिव सामर्थ्य सेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री.अमित देशमुख,प्रवक्ता श्री.नितीन ढेरंगे,कोषाध्यक्ष श्री.मनोज घोडेस्वार,ईशान्य मुंबई अध्यक्ष श्री. हितेश गायकवाड,समाजसेविका सौ.नंदिनी साठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या सामजिक  कार्यास हातभार लावलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे संस्थेने आभार व्यक्त केले आहेत!!

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने